देवगड ते नांदगाव बस सुरू

एसटी संपानंतर पहिलीच फेरी

देवगड रापम सेवेतील देवगड आगारातून एक पांढरी लाल रंगाची परी (प्रवासी फेरी ) देवगड ते नांदगाव महामार्गावर देवगड आगारातून अवतरली आणि प्रवासी वर्गाला हायसे वाटले !परंतु तो आनंद क्षणभंगुर ठरला .आणि प्रवासी जनता नाराज झाली . त्याचे असे झाले, रापम देवगड आगारातील सर्व कर्मचारी चालक वाहक ,वहातुक नियंत्रक ,यानी बेमुदत संप १००% यशस्वी करीत असताना मंगळवारी सकाळी देवगड आगारातून पांढरीलाल फेरी देवगड निपाणी मार्गावर आली आणि नागरिकांनी डोळे टवकारले,.प्रशासनाकडे चौकशी केली असता या आगारातील चालक प्रकाश जगन्नाथ मेस्त्री यांनी आपली प्रदीर्घ चालक सेवा बजावून ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होणार होते .दि ७ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत चालक मेस्त्री यांनी सेवनिवृत्तीपूर्वी रजा उपभोगून ते ३० नोव्हेंबर रोजी देवगड आगार मध्ये आपला सेवेतील अंतिम दिवस भरण्याकरिता आले .बेमुदत संप काळात ते रजेवर होते. आपली रजा संपल्यानंतर ते सेवेत रुजू झाले व आपले कर्तव्य बजावले हेही कौतुकास्पद आहे.स्थानकनप्रमुख श्रीकांत सैतवडेकर यानी त्यांना सेवेतील शेवटचा दिवस विभागीय कार्यालयात पसिंग करण्याकरिता पाठविण्यात येणारी एसटी बस सोडावी .अशी सूचना केली .संप असल्याने एसटी बस नेता येईल का?कामगार रोखतील ही भीतीही त्यांच्या मनात क्षणभर आली. परंतु नेहमीच देवगड आगारातील कामगार एकमेकांना सहकार्य करून वागत असल्याने त्यांनी त्या श्री मेस्त्री चालकांना एसटी बस सोडण्याकरिता अटकाव न करण्याचे निर्णय संपकरी कामगारांनी घेतला व एसटी प्रशासनाबरोबर त्या चालकांला सहकार्य केले .व त्या चालकाच्या पुढील सेवानिवृत्त पर जीवनास शुभेच्छा दिल्या .त्या चालकाचे चेहऱ्यावर प्रामाणिक सेवांनिवृत्तीचे आनंदाश्रू दिसून आले.आणि बाहेर पडलेल्या एसटी गाडीच्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला. फ़ोटो देवगड निपाणी मार्गावरील प्रवासी फेरी

You cannot copy content of this page