सामाजिक कार्याबद्दल विनोद भोगावकर यांचा सत्कार

मालवण ता.३०-: मालवण कुंभारमाठ येथे विविध सामाजिक कामे करुन गावच्या विकासात मोलाची कामगिरी बजावणारे माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते श्री. विनोद भोगांवकर यांचा सामाजिक कार्याबद्दल कुंभारमाठ कुंभार समाज मंडळ मुंबई यांच्या वतीने शाल, श्रीफळ , पुष्प – गुच्छ , व श्री गणेशाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. कुंभारमाठ येथील ग्रामदैवत श्री ब्राह्मण देव जत्रौत्सवात विनोद भोगावकर यांना या सत्काराने सन्मानित करण्यात आले. विनोद भोगांवकर यांनी जे सामाजिक उपक्रम राबवले ते खरोखरचं कौतुकास्पद आहेत, असे मंडळाचे पदाधिकारी राजू सडविलकर यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी विनय वाटेगांवकर, प्रशांत सडविलकर, राजू सडविलकर, प्रशांत भोगांवकर, बाबू भोगांवकर, बाबू माणगांवकर, विलास भोगांवकर, सुनील भोगांवकर, सिद्धेश भोगांवकर, कुंभारमाठ सरपंच प्रमोद भोगांवकर, उपसरपंच मनोज वाटेगावकर, कुंभार समाज तालुका अध्यक्ष दिलीप सांगवेकर, कुंभारमाठ कुंभार समाज अध्यक्ष संतोष गुडेकर , उपस्थित होते.

You cannot copy content of this page