पूजा करलकर यांनी केंद्र सरकारकडून निधी आणला का ?

सेनेच्या महिला समन्वयक पूनम चव्हाण यांचा प्रश्न

मालवण (प्रतिनिधी) नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मालवणच्या विकास कामात कधीही दुजाभाव केला नाही. किंवा विरोधकांनी सूचवलेली कामे नाकारली नाही. प्रभाग सात मधील दोन्ही नगरसेवक भाजपाचे असताना गेल्या पाच वर्षात २ कोटीचे प्रस्ताव नगराध्यक्ष यानी मंजूरी करून आणले. मात्र काम असेल तेव्हा नगराध्यक्ष आणि आमदार याना फोन लावायाचे आणि काम झाल की ते आपल्या पाठपुराव्या मुळे झाले असे सांगायचे हे नगरसेविका पूजा करलकर यांचे काम आहे. फक्त एक पत्र दिले म्हणजे पाठपुरावा होत नाही. सत्ता शिवसेनेची, नगराध्यक्ष शिवसेनेचे, पालकमंत्री, खासदार, आमदार शिवसेनेचे मग पूजा करलकर यांनी पाठपुरावा कोणाकडे केला ? नगरसेविका करलकर यांनी केंद्र शासनाचा निधी आणला काय ? याचे उत्तर द्यावे,असा सवाल शिवसेनेच्या महिला मालवण तालुका समनव्यक सौ. पूनम चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे विचारला आहे. मालवण प्रभाग सात मधीलच भाजप पक्षाचे नगरसेवक अप्पा लुड़बे हे काम मंजूरी बाबत प्रशासनाचे जाहीर आभार मानत आहेत. आणि पूजा करलकर या नगराध्यक्ष, आमदार, खासदार, पालकमंत्री यांचे आभार मानायचे सोडून आपण एकट्याच्या प्रयत्नाने काम झाल्याचे सांगून आपल्याच पक्षाचे आपल्या प्रभागतील नगरसेवक आपा लुड़बे यानी काहीच काम केले नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे की काय? निदान आपल्या बरोबर आपल्या पक्षाच्या नगरसेवकाला तरी कामाचे श्रेय द्यायला पाहिजे होते, असा टोला पूनम चव्हाण यांनी लगावला आहे. प्रभाग सात मधील जनतेला नक्की माहिती आहे की सत्ताधारी पक्षाने आपली कामे मंजूरी केली आहेत. महाराजा हॉटेल रस्ता, त्याचप्रमाणे एसटी स्टैंड मागे जाणाऱ्या रस्त्यासाठी तिकडच्या स्थानिक लोकानी नगराध्यक्ष यांच्या कड़े पाठपुरावा केला आहे. गणेश कोंड येथील सुशोभीकरण बाबत तेथील स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष यांच्याकड़े मागणी केली होती. करलकर यांनी सोयी प्रमाणे राजकारण करायचे सोडून द्यावे. ज्याचे श्रेय त्याला द्यायला शिकावे. संबंधितांचे आभार मानता येत नसतील तर निदान सत्ताधारी , नगराध्यक्ष , आमदार , खासदार यांच्या शिवाय निधी मंजूर करुन आणल्याचे सांगून स्वतःचे अज्ञान तरी प्रकट करु नये असेही पूनम चव्हाण यांनी म्हटले आहे. प्रभाग ७ मध्ये जी २ कोटीची कामे झाली ती करलकर यांच्या पाठपुराव्या मुळे झाली, मग मंजूरीसाठी प्रस्ताव नगराध्यक्ष किवा प्रशासन यांनी केला नसेल तर मग करलकर यांनी पत्र केंद्र शासनाला दिले होते का ? करलकर यांनी केंद्र शासनाचा निधी आणला काय ? याचे उत्तर द्यावे, असेही पूनम चव्हाण यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page