वंचित बांधकाम कामगारांना मिळणार सुरक्षा कीट

येत्या आठवड्यापासून सुरू होणार वाटप प्रक्रिया;स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती

*⚡कुडाळ ता.२८-:* इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीत कामगारांसाठी राबविला जाणारा सुरक्षा कीट वाटप उपक्रम कामगार विभागाकडून पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. राज्यात कोविड 19 आपत्ती प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर वाटप प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली होती. सद्यस्थित जिल्ह्यात कोविड प्रभाव कमी झाल्याने संघटनेच्या वतीने किट वाटप उपक्रम पुनश्च चालू करावा यासाठी पाठपुरावा करण्यात आलेला होता. याची दखल घेऊन मंडळाने ज्या कामगारांना सुरक्षा कीट लाभ मिळालेला नाही अशा कामगारांना किट उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिल्याने जिल्ह्यात पुढील आठवड्यापासून वाटप प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ज्या नोंदीत कामगारांना सुरक्षा कीट लाभ मिळालेला नाही अशा कामगारांनी स्वाभिमानी कामगार संघटनेच्या पणदूर येथील कार्यालयात (91562 68311)अधिक मार्गदर्शनासाठी संपर्क करावा, असे आवाहन स्वाभिमानी कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page