*⚡कणकवली ता.२७-:* खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व एनसीसी विभाग खारेपाटण हायस्कुल यांच्या सयूंक्त विद्यमाने आज राष्ट्रीय भारतीय संविधान दिनानिमित्त खारेपाटण हायस्कुल ,खारेपाटण बसस्थानक ते शिवाजी पेठ खारेपाटण अशी शालेय विद्यर्थ्यांसह शिक्षकांनी जागरूकता प्रभात फेरी काढली. प्रारंभी शाळेतील विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुदायिक पठण केले.यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री आकिवाटे व पर्यवेक्षक संजय सानप यांनी प्रभात फेरीचे उदघाटन हिरवा झेंडा दाखवून केली. यावेळी” माझे संविधान माझी जबाबदारी” तसेच “माझे संविधान माझा अभिमान ” व संविधान आहे महान,सर्वांना हक्क समान ” या सारख्या विविध घोषणा शालेय विद्यर्थानी देऊन परिसर दणाणून सोडला. भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विदयार्थ्यांना व समाजाला समजावी आणि घटनेतील मूलतत्त्वे त्यांच्या मनावर खोल रुजली जावीत याकरिता भारतीय संविधान दिनानिमित्त जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली असल्याचे शाळेचे मुख्यध्यापक आकिवटे यांनी सांगितले .या प्रभात फेरीमध्ये एन सी सी ऑफीसर राम कापसे क्रीडा शिक्षक श्री.पाडवी सर व श्री भिसे हे सहभागी झाले होते.
भारतीय संविधान दिनानिमित्त खारेपाटणमध्ये प्रभातफेरी
