निर्माता सुनील भोसले यांची पत्रकार परिषदेत माहिती
*⚡सावंतवाडी ता.२६-:* सिंधुदुर्गात सुरू असणाऱ्या रात्रीस खेळ चाले 3 च्या टीमने सेटवर आज पत्रकार परिषद घेऊन मालिकेबाबत माहिती देत, कलाकारांनी आपल्या पात्रांचा उलगटा केला. यावेळी बोलताना निर्माता सुनील भोसले यांनी सांगितले की, या मालिकेच्या तिन्ही भागातून कोकण सर्वदूर पसरवण्याचा मानस आपला आणि झी चा होता. तो पूर्ण होत आहे. कोकणातील दशावतारी नाटक, भजन, फुगडी यासारखे अनेक कला झी च्या माध्यमातून सर्वदूर पसरली आहे. या मालिकेमुळे कोकणात एक मोठं कुटुंब निर्माण झाले आहे. अनेकांनसोबत घरगुती नाते सबंध निर्माण झाले असल्याने कोकण सोबत आपुलकीचं नातं निर्माण झाले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यापुढे देखील कोकणासाठी झी च्या माध्यमातून काहीतरी चांगल देण्याचे काम करू असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले आहे. या मालिकेची आता वाडा पापमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे मत या मालिकेचे लेखक प्रल्हाद कुडतरकर यांनी व्यक्त केले. यावेळी या मालिकेचे दिग्दर्शन राजू सावंत यांनी ही सिरियल करताना स्थानिकांना काम देऊन त्यांच्याकडून काम करून घेण्यात खुप आनंद मिळाला असे मत व्यक्त केले.
