मालवण येथील वरेरकर नाट्यगृहात रंगणार प्राथमिक फेरी;नाट्यसंस्थांना सहभागाचे आवाहन
मालवण दि प्रतिनिधी सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्यावतीने ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटयस्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन दि. १५ जानेवारी २०२२ ते १० फेब्रुवारी २०२२ या दरम्याने मामा वरेरकर नाटयगृह मालवण येथे करण्यात येणार आहे. गतसाली कोरोनामुळे ही स्पर्धा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली होती. यंदाची ही स्पर्धा हीरक महोत्सवी स्पर्धा असल्याने या स्पर्धेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. प्रवेशिका सादर करण्याचा अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०२१ असून विहीत नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या www.mahasanskruti.org या वेबसाईट वर नवीन संदेश या मथळयाखाली उपलब्ध होतील. स्पर्धेसाठी जिल्हयातील जास्तीत जास्त नाटय संस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने स्पर्धा समन्वयक संजय शिंदे, मालवण- सिंधुदुर्ग केंद्र यांनी केले आहे.
