मालवणात २८ रोजी आंबा व्यावसायिक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळावा

*⚡मालवण ता.२६-:* सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संघ मर्यादित सिंधुदुर्ग या संस्थेतर्फे आंबा व्यावसायिक शेतकऱ्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी मार्गदर्शन मेळावा रविवार दि.२८ नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक १० ते सायंकाळी ४ या वेळेत मालवण वायरी येथील आर.जी.चव्हाण मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. या शिबिरात मार्गदर्शक श्री.विद्याधर जोशी, (देवगड- प्रगतिशील शेतकरी), श्री.देवेंद्र डांगे व श्री.मधुकर हेगडे (मनशा मार्केटिंग प्रा. लि.,पूणे)विषय- प्लांट न्युट्रीशन), श्री.श्रीधर फाटक (मुंबई श्रीवली ॲग्रो), विषय – ग्रेडिंग, पॕकिंग व निर्यात, श्री.सिद्धेश शिवनाथ येडवे,(रिलायन्स जनरल ईन्श्युरन्स) विषय-पुनरर्चित हवामानावर आधारीत फळ पिक विमा, श्री.प्रतिक पाटील,(ग्रीन रिव्ह्वोल्युशन)-विषय-एकात्मिक पीक संरक्षण, श्री.नारायण चेंदवणकर, विषय-मधुमक्षी पालन, श्री.सुर्यकांत नारकर,(कोळंब) विषय- वानरांपासून होणारी नुकसान भरपाई-एकाकी पणे जिंकलेली लढाई, आदी मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात संस्थेमार्फत नोंदणी केलेल्या जि.आय. मानांकन प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येईल. सरकारचे कोरोना संबंधीचे सर्व नियम पाळत आंबा व्यावसायिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संजय नरे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page