बांद्यात ग्रामपंचायत पोट निवडणुकीसाठी भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष संदीप बांदेकर इच्छुक

*⚡बांदा ता.२६-:* बांदा ग्रामपंचायत येथे प्रभाग क्रमांक 4 मध्ये एका जागेसाठी पोट निवडणूक जाहीर झाली असून, त्या निवणुकीस उभे राहण्यासाठी भाजपमधून भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष संदीप बांदेकर हे इच्छुक असून, केंद्रीय मंत्री नारायण राणे व रवींद्र चव्हाण यांनी संधी दिल्यास आपण त्या भागातून निवडणूक लढवून आपल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने निश्चितच विजय संपादन करू आसा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. गेली अनेक वर्ष ते सामाजिक कार्यात अग्रेसर असून, पक्षातील पदाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळोवेळी आंदोलन करून न्याय मिळवून दिला आहे. यापूर्वी त्यांनी बांदा शहर युवा अध्यक्ष म्हणून काम केले असून, सिंधुदुर्ग जिल्हा विज कंत्राटी कामगार कार्यकारणी जिल्हाध्यक्ष पदी ते सद्या काम करत आहेत. त्यानी आपल्या पदाचा जोरावर अनेक बेरोजगार युवकांना सावंतवाडी – बांदा पंचक्रोशीत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. भाजपने ही निवडणूक लढवण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास निश्चितच या निवडणुकीत विजय संपादन करून वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवू असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page