कणकवलीत १ लाख १९ हजार रुपयांची दारू जप्त

एलसीबी पथकाकडून धडक कारवाई; गुन्हा दाखल

*⚡कणकवली ता.२६-:* कणकवली-ओसरगाव तलावाजवळ बोलेरो गाडीतून गोवा बनावटीची दारू करत असल्या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने काल रात्री उशिरा धडक कारवाई करत गजानन रावजी जाधव (42 त्रिंबक -बौद्धवाडी, मालवण, सध्या राहणार नाडकर्णीनगर कलमठ – कणकवली) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत १ लाख १९ हजार ४०० रुपयांची गोवा बनावटीची दारू आणि दोन लाखाची बोलेरो जप्त करण्यात आली. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे हेड कॉन्स्टेबल प्रवीण वालावलकर यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दाखल फिर्यादीनुसार, स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाची कणकवलीत गस्त सुरु असताना ओसरगाव तलावाजवळ बोलेरो गाडी संशयास्पदरित्या उभी असलेली आढळली. या गाडीची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीची दारू असल्याचे आढळून आले. या गाडीमध्ये ५७ हजार रुपये किमतीचे व्हिस्कीचे १९ बॉक्समध्ये २२८ बाटल्या आणि ६२ हजार ४०० रुपये किमतीच्या १३ बॉक्समध्ये ६२४ बाटल्या या गाडीत असल्याचे आढळून आले. दारूने भरलेली बोलेरो गाडी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कणकवलीत पोलिसात आणून पंचांसमक्ष पंचनामा केला. आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक एम. एम. शेळके, सी. आर. पालकर, गुरुनाथ कोयंडे, प्रवीण वालावलकर यांच्या पथकाने केली. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.

You cannot copy content of this page