चौके येथे महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा

*⚡मालवण ता.२६-:* चौके येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. वैभवी निलेश चौकेकर यांच्या वतीने महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा दि. ३० नोव्हेंबर रोजी ३ वाजता चौके येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे प्रथम- सोन्याची नथ, द्वितीय चांदीची पैंजण, तृतीय – चांदीचे नाणे अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तर पाच उत्तेजनार्थ बक्षिसे व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत. अधिक माहिती व नावनोंदणी साठी ९४०३७३४६०८ या क्रमांकावर संपर्क साधावा, स्पर्धेच्या वेळी कोरोना विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page