आता सहकार क्षेत्रातही झळकणार मनसेचा झेंडा

परशुराम उपरकर, धीरज परब यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत केला निर्धार;नवीन पदनियुक्तीत युवकांना देणार संधी

*⚡कुडाळ ता.२६-:* मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष धिरज पराब यांच्या कार्यालयात मनसे सहकार सेनेची सभा झाली. यावेळी सहकार सेनेच्या पद नियुक्ती संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील सद्य सहकार परिस्थितीवर चर्चा करून सहकाराची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संदर्भात असलेल्या अडचणींवर आपण कशी मात करु शकतो, याबाबतही चर्चा – विनिमय करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने व नेते तथा सहकार सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप (बापू )धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली सहकार सेनेचा कोकण विभागीय दौरा आजपासून सुरू झाला आहे. या दौऱ्यामध्ये विजय जाधव (सरचिटणीस सहकार) , कौस्तुभ लिमये (सचिव सहकार), संजय अराडकर (संघटक प्रभारी कोकण), संतोष कदम (संघटक भायखळा विधानसभा) यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पक्षाचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष धिरज पराब यांच्या कार्यालयात मनसे सहकार सेनेची सहकार सेनेच्या पद नियुक्ती संदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील सद्य सहकार परिस्थितीवर चर्चा करून सहकाराची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संदर्भात असलेल्या अडचणींवर आपण कशी मात करु शकतो तसेच जिल्हा सहकारातुन समुद्धी कडे कसा नेऊ शकतो याच्यावर विचार मथंन करण्यात आले. मनसेतर्फे सहकार विभागासाठी कुशल असे पदाधिकारी, कार्यकर्ते कसे निर्माण होतील यावर देखील चर्चा झाली, विविध सहकारी संस्था स्थापन करून त्या माध्यमातून लोकांना सभासद करून रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. या अनुषंगाने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तसेच राज ठाकरे यांचे नेतृत्व मानणाऱ्यांनी महाराष्ट्र निर्माण सहकार सेनेचे काम करण्यासाठी पुढे यावे व सहकारातून जिल्ह्याची समृद्धी करून राज ठाकरे यांचे हात सहकारातून मजबूत करावेत, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page