नगरसेवक, कर्मचारी आणि पत्रकारांनी घेतली शपथ
*⚡सावंतवाडी ता.२६-:* सावंतवाडी नगरपालिकेची आज विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आज असलेल्या संविधान दिनाचे औचित्य साधून या सभेला उपस्थित असलेल्या सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष नगरसेवक, कर्मचारी आणि पत्रकार यांनी संविधानाचे वाचन करून शपथ घेतली. तसेच यावेळी 26/11 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी, सैनिक आणि निष्पाप नागरिकांना त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी स्वर्गवासी झालेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
