श्री रामेश्वराचा वार्षिक जत्रौत्सव ३० नोव्हेंबर रोजी

*⚡वेंगुर्ला ता.२६-:* वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा वार्षिक जत्रौत्सव मंगळवार दि.३० नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक विधी, केळी-नारळ ठेवणे, रात्रौ १० तरंगदेवता व श्री सातेरी पालखीचे आगमन झाल्यावर श्री रामेश्वर, श्री नागनाथ-भगवती, श्री गणपती-दत्त व लालखी यांची मंदिराला प्रदक्षिणा, त्यानंतर वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. तरी भाविकांनी जत्रौत्सवाला उपस्थित रहावे असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page