कंगना राणावत ला न्यायालय दोषी ठरवत नाही तोपर्यंत तिच्या विरोधात निषेधाचा ठराव घेता येणार नाही

नगराध्यक्ष संजू परब यांनी स्पष्ट केली भूमिका…

*⚡सावंतवाडी ता.२६-:* कंगना राणावत ने स्वतंत्र मिळाल्या संदर्भात शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज झालेल्या विशेष सभेत तिच्या विरोधात निषेधाचा ठराव मांडला होता. परंतु, सत्ताधाऱ्यांनी तो ठराव फेटाळून लावत जोपर्यंत न्यायालय तिला दोषी ठरवत नाही. तोपर्यंत त्या वक्तव्याचा निषेध करता येणार नसल्याची स्पष्ट भूमिका नगराध्यक्ष संजू परब यांनी यावेळी मांडली.

सावंतवाडी नगरपालिकेची आज विशेष सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकीला अनेक ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले आहेत. यावेळी माजी सैनिक संघाला प्रशिक्षण केंद्रासाठी देण्यात आलेल्या जागेची आरक्षण प्रयोजन बदलून त्याऐवजी ट्रेनिंग सेंटर असे आरक्षण करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. तसेच यावेळी नगरपालिकेने घेतलेली हायड्रॉलिक सिडी कोणालाही भाड्याने देऊ नये यासाठी देखील एकमुखाने सर्वाने होकार देत. ती सिडी भाड्याने देऊ नये असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. असे विविध ठराव यावेळी मंजूर करण्यात आले आहेत.

You cannot copy content of this page