नगरपरिषदेतर्फे आयोजन;नगरसेविका दीपाली भालेकर यांचा सहभाग
*⚡सावंतवाडी ता.२५-:* नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरात शाळा-कॉलेज यांच्या स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले. नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत प्रभाग क्रमांक 1 मध्ये या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वि. स. खांडेकर विद्यालय व कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय आदर्श पुरस्कार प्राप्त जि. प. शाळा नंबर 6 या शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग दर्शविला. यावेळी स्वच्छतेबाबत जनजागृती रॅली शहरातून काढण्यात आली. यावेळी नगरसेविका दिपाली भालेकर, वि. स. खांडेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम पवार, शाळा नंबर 6 च्या मुख्याध्यापिका सायली लांबर, श्री परीट सर ,श्री काळे सर, श्री कोळी सर ,सौ गीता सुतार आदि उपस्थित होते.
