आपल्या वार्डमध्येच ड्रीलिंग खोदाई का…?

समीर वंजारी यांचा संजू परब यांना सवाल;शहरात इतरत्रही ड्रीलिंग खोदाईची केली मागणी

*⚡सावंतवाडी ता.२३-:* नगराध्यक्ष संजू परब जर आपल्या वार्डमध्ये ड्रीलिंग करून केबल घालू शकतात तर शहरातील मुख्य बाजारपेठ, वैश्यवाडा तसेच इतर ठिकाणीही ड्रीलिंग करून केबल टाकू शकतात, त्यासाठी ठिकठिकाणी खुदाई करून ठेवण्याची काय गरज, अशी प्रतिक्रिया ग्लोबल महाराष्ट्र चॅनलशी बोलताना काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी दिली. वंजारी म्हणाले, सावंतवाडी शहर स्वच्छ शहर म्हणून आदीच नावाजलेल आहे. आपल्या वार्डमध्ये जर ड्रीलिंग करून केबल घालू शकतो तर मुख्य बाजारपेठ, वैश्य वाडा तसेच इतर ठिकाणी ड्रीलिंग करून केबल टाकू शकतो, कारण कुठे पाईपलाईन आहेत, याचे आराखडे नगरपालिकेकडे आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी खुदाई करण्याची आवश्यकता नाही. जिथे अडथळे आहेत तिथे तुम्ही खुशाल खुदाई करा, असेह वंजारी म्हणाले. तसेच शहरात कुठे कुठे खुदाई झाली याची माहितीही प्रशासनाला नाही.

You cannot copy content of this page