सत्यवान बांदेकरांच प्रतिउत्तर; कितीही खटपट केली तरी निवडून येणार नाही
*⚡सावंतवाडी ता.२३-:* २० वर्षांपूर्वी शांत व सुसंस्कृत शहराला काळिमा फासणाऱ्या समीर वंजारी यांना नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी कितीही नौटंकी केली आणि महाविकास आघाडी करून आगामी नगरपालिका निवडणूक लढवली तरी देखील नगरपालिका निवडणुकीत भाजपची सत्ता येणार असे प्रतिउत्तर भाजपचे तालुका उपाध्यक्ष सत्यवान बांदेकर यांनी दिले आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, शहरातील सर्व विकास कामे जनतेला विश्वासात घेऊनच केली जातील. विरोधकांनी उगाच निवडणुकीच्या तोंडावर स्टंटबाजी करून, जनतेच्या डोळ्यात धूळफेक करू नये. गांधी टोपी घातली म्हणून कोणी गांधी बनत नाही. समीर वंजारी यांना संपूर्ण सावंतवाडी ओळखते, त्यामुळे त्यांनी कितीही खटपट केली तरी ते निवडून येणार नाहीत असा टोला देखील सत्यवान बांदेकर यांनी लगावला आहे.
