तालुक्यातील एका हॉटेलवर काल रात्री पोलिसांची कारवाई …

34 जणांवर गुन्हा दाखल

*⚡सावंतवाडी ता.२३-:* तालुक्यातील एका हॉटेलवर काल रात्री पोलिसांनी धडक कारवाई केली असून, एकूण 34 संशयित आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका हॉटेल वर काल रात्री उशिरा कारवाई केली असून, या हॉटेल ला लोकांची राहण्याची व्यवस्था करण्याची परवानगी नसताना तसेच कोरोना आजारामुळे शासनाने मनाई आदेश जारी केले असताना देखील आदेशाचा भंग करून त्या हॉटेल मध्ये राहण्याची सोय केल्याने त्याच प्रमाणे अवैधरित्या दारू बाळगून, मद्य प्राशन करून गाण्याच्या तालावर अश्लील हावभाव केल्याने ही कारवाई करण्यात आली असून, 34जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page