⚡मालवण ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मानाची समजली जाणारी इंडियन ऑईल पुरस्कृत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत
आर्या दिघे हिने मुलींच्या ११, १३ आणि १५ वर्षाखालील गटामध्ये विजेतेपद मिळवून तिहेरी मुकुट पटकावला तर मुलांच्या १५ आणि १७ वर्षाखालील गटात इशांत वेंगुर्लेकर याने विजेतेपद मिळविले. तर साईशा उस्कैकर १७ वर्षाखालील मुलींच्या आणि महिला एकेरीतही विजयी झाली. तसेच रजत तोरस्कर याने पुरुष एकेरीत तसेच अक्षय शेटकरचे साथीने दुहेरीतही विजेतेपद मिळविले.
इंडियन ऑईल पुरस्कृत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा दि. २० आणि २१ नोव्हेंबर रोजी डाॅ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटीच्या वायरी मालवण येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात पार पडली.
स्पर्धेचा निकालपुढीलप्रमाणे:- ११ वर्षा खालील मुली- प्रथम आर्या दिघे, द्वितीय नक्षत्रा जावकर, १३ वर्षा खालील मुली- प्रथम आर्या दिघे, द्वितीय दुर्वा चिपकर, १५ वर्षा खालील मुली- प्रथम आर्या दिघे, द्वितीय- पावनी मालणकर, १७ वर्षाखालील मुली- प्रथम साईशा उस्कैकर, द्वितीय हिमानी येरम. महिला खुला गट- प्रथम साईशा उस्कैकर, द्वितीय- तनिष्का मयेकर.
११ वर्षाखालील मुले- प्रथम आधिष पेडणेकर, द्वितीय लौकिक तळवडेकर, १३ वर्षाखालील मुले- प्रथम गणेश चव्हाण, द्वितीय प्रज्वल नामनाईक, १५ वर्षाखालील मुले- प्रथम इशांत वेंगुर्लेकर, द्वितीय दिग्गज जाधव, १७ वर्षाखालील मुले- प्रथम इशांत वेंगुर्लेकर, द्वितीय- दिग्गज जाधव, पुरुष खुला गट- प्रथम रजत तोरस्कर, द्वितीय- पंकज तुळसुलकर, उपांत्य फेरी गाठलेले- प्रथम गौतम वाडकर, द्वितीय अक्षय शेटकर, उपांत्यपूर्व फेरी गाठलेले- प्रथम साईल पारकर, द्वितीय सुयोग महाडेश्वर, तृतीय अतुल गवस, चतुर्थ सुजन परब, पुरुष दुहेरी- प्रथम रजत तोरस्कर आणि अक्षय शेटकर, द्वितीय- सुजन परब आणि चंद्रकांत साळवे.
यावेळी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन जनरल मॅनेजर अंजली भावे यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातून खेळाडू घडविण्यासाठी अशा स्पर्धेची अत्यंत आवश्यकता आहे. अशा स्पर्धेच्या आयोजनासाठी इंडियन ऑइल कंपनीकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल, असे यावेळी अंजली भावे यांनी सांगितले.
याप्रसंगी मालवण टेबल टेनिस अकॅडमीमध्ये पूर्वी प्रशिक्षण घेतलेला खेळाडू रजत तोरसकर याने अलीकडेच विलेपार्ले मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र टेबल टेनिस असोसिएशनच्या रँकिंग स्पर्धेमध्ये कास्यपदक मिळविल्याबद्दल त्याचा यथोचित गौरव करण्यात आला.
या स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू म्हणून इशांत वेंगुर्लेकर याची निवड करुन प्रभाकर वाळवे यांनी रोख पारितोषिक दिले. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गचे अध्यक्ष विष्णू कोरगांवकर, सचिव हेमंत वालकर, शशांक घुर्ये ,डाॅ.अश्विन दिघे, काँग्रेस सेवादल जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुजन परब, चंदू साळवे, लक्ष्मण मेस्त्री आणि विवेक कोरगांवकर यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन दीपक जाधव यांनी केले.
