जिल्ह्यातून दोनदा आणि राज्यातून तिसऱ्यांदा प्रथम हापूस आंबा पाठविणाऱ्या उत्तम फोंडेकर यांचा खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार

मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोनदा आणि राज्यातून तिसऱ्यांदा प्रथम हापूस आंबा पेटी पाठविण्याचा बहुमान पटकावणाऱ्या कुंभारमाठ मालवण येथील उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांचा सत्कार संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग कॉलेज आणि कुडाळ येथील व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा झाला. या सोहळ्यात कुंभारमाठ येथील उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांनी जिल्ह्यातून दोनदा आणि तिसऱ्यांदा राज्यातून प्रथम हापूस आंबा पेटी पाठविल्या बद्दल खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी फोंडेकर यांचा युथ आयकॉन या शब्दांत गौरव केला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाड़े, माजी आमदार प्रवीण भोसले, व्हिक्टर डान्टस, डॉ. विवेक रेडकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page