अखेर बळीराजाने मोदी सरकारला नमवले – अरविंद मोंडकर

*⚡मालवण ता.१९-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्याने गेले वर्षभर दिल्ली सीमेवर ठाण मांडून आंदोलन करत असलेल्या देशातील बळीराजाचा विजय झाला आहे. अखेर बळीराजाने मोदी सरकारला नमवले आहे, अशी प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. केंद्रातील मोदी सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले असून शेतकऱ्यांनी सरकारला अन्यायकारक तीन कृषी कायदे मागे घेण्यास लावले आहे. ६०० पेक्षाही जास्त शेतकरी बांधवांचे बळी घेणाऱ्या केंद्र सरकारच्या दडपशाहीचा सामान्य शेतकऱ्यांनी पराभव केला. यूपी मध्ये देशात होणाऱ्या भविष्यातील निवडणूक मध्ये नुकसान होऊ नये म्हणून कदाचित मोदी आता दोन पावलं मागे येत असल्याचे दिसत आहे असेही मोंडकर यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी हे अंबानी व अदानी यांकरिता हे कायदे करत होते. मोदी विविध मार्गाचा अवलंब करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करूनही शेतकऱ्यांना समजावून सांगू शकले नाहीत. कृषी अर्थतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, प्रगतीशील शेतकरी यांनाही कृषी कायद्यांचे महत्त्व पटवून देण्याचा खोटा आटोकाट प्रयत्न मोदींनी केला. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे जरी मोदी म्हणाले तरी जोपर्यंत संसदेच्या दोन्ही सभागृहात हा कायदा रद्द झाल्याचा शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील व त्यांच्या खांद्याला खांदा लावून भविष्यात देखील बळीराजा सोबत राहील, असेही मोंडकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page