*⚡मालवण ता १९-:* कोल्हापूर येथील अथायु हॉस्पिटल व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान-सिंधुदुर्ग शाखा मालवणतर्फे मोफत हृदयविकार व दुर्बिणीद्वारे मुतखडा व प्रोस्टेट ऑपरेशन शिबीर २८ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत येथील दैवज्ञ भवन येथे आयोजित करण्यात आले आहे. डॉ. सिधनगौड़ा मालिबिरादर (एमबीबीएस, एमडी, मेडिसीन, डीएम, कार्डिओलॉजी), डॉ. राहुल पाटील (मुत्रविकार तज्ज्ञ) हे उपचार करणार आहेत. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना (पिवळे व केशरी रेशनकार्डधारकांना) अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, मुतखडा, प्रोस्टेट शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. मोफत ईसीजी व रक्तातील साखर तपासणी केली जाणार आहे. नाव नोंदणीसाठी किशोर नाचणोलकर (७७२१८५१३०४), नीलेश गवंडी, मदन गोरे (मार्केटिंग मॅनेजर, अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर (मोबाईल-८९२८७३६९९९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मालवणात २८ रोजी मोफत हृदयविकार शिबीर
