तळवडे ग्रामपंचायतीला मिळाला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी

पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांच्या प्रयत्नांना यश

सावंतवाडी दि.१९ नोव्हेंबर (प्रतिनिधी) तळवडे ग्रामपंचायतीला तब्बल एक वर्ष पाच महिन्यानंतर कायमस्वरूपी ग्राम विकास अधिकारी मिळाले आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशाने व शिवसेना तालुकाप्रमुख, पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे गावच्या विकासाला दिशा मिळेल असा विश्‍वास तळवडे गावातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. तळवडे ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी पद ३१ मे २०२० पासून रिक्त होते तो अतिरिक्त भार दुसऱ्या ग्राम विकास अधिकाऱ्यांकडे होता. त्यामुळे गावाच्या विकासावर परिणाम जाणवत होता. तळवडे ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत असून या गावच्या विकासाला दिशा मिळाली होती पण ग्राम विकास अधिकारी नसल्यामुळे विकासाला खीळ बसल्याची धारणा गावातील लोकांसह शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे शिवसेना तालुकाप्रमुख, पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. पालकमंत्री सामंत यांनी तात्काळ विभागीय कोकण उपायुक्तांना आदेश दिल्यानंतर कोकण उपायुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश दिले यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी देवगड तालुक्यातील पडेल येथील नामदेव रामचंद्र तांबे यांची ग्रामविकास अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे तळवडे गावातील नागरिक व शिवसैनिकांनी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर व तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचे अभिनंदन केले आहे. तळवडे ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी मिळाल्याने विकासाची दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांना तळवडे गावातील लोकांच्या वतीने रूपेश राऊळ यांनी धन्यवाद दिले. फोटो पालकमंत्री उदय सामंत यांना धन्यवाद देताना रूपेश राऊळ

You cannot copy content of this page