सार्वजनिक उपक्रम समितीने घेतला सिडकोच्या प्रकल्पांचा आढावा

*⚡कणकवली ता.१८-:* महाराष्ट्र विधानमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीने बुधवारी महाराष्ट्र शहर व औद्योगिक विकास महामंडळ सिडको भवन बेलापूर नवी मुंबई येथे दौरा करत सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच सिडको उभारत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची पाहणी केली. व कामकाजाची माहिती यावेळी घेण्यात आली. त्याचबरोबर विविध सूचना करण्यात आल्या. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष आमदार अशोक पवार, समितीचे सदस्य तथा कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक,मंत्रालयीन सचिव श्री.जावळे, सिडकोचे एम.डी.संजय मुखर्जी,सिडकोचे मॅनेजर करण शिंदे, म्हाडाचे अधिकारी श्री.पाटील,श्री.पडवळ यांसह सार्वजनिक उपक्रम समितीचे सर्व सदस्य, संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होते.

You cannot copy content of this page