मळगाव रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज

*⚡सावंतवाडी ता.१८-:* सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज १८ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. जत्रोत्सवानिमित्त सकाळपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सायंकाळी केळी, नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर मळगाव येथील दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ व देवस्थान कमिटीने केले आहे.

You cannot copy content of this page