माठेवाडा येथील श्री देव आत्मेश्वर मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात

सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत खेम सावंत-भोसले यांची उपस्थिती

*⚡सावंतवाडी ता.१८-:* माठेवाडा येथील श्री देव आत्मेश्वर मंदिराचा कलशारोहण सोहळा सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत खेम सावंत-भोसले यांच्याप्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. 200 वर्षांपूर्वी तिसरे खेमसावंत भोसले यांच्या कार्यकाळात आत्मेश्वर मंदिराची स्थापना झाली. आत्मेश्वर आणि प्राणेश्वर अशी दोन शिवलिंग असणार हे एकमेव मंदिर असून या मंदिरासमोर असणारी तळी 12 महिने प्रवाहित असते. संस्थानकालीन परंपरा असलेल्या या ऐतिहासिक श्री देव आत्मेश्वर मंदीराचा कलशारोहण सोहळा कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेस गुरूवारी पार पडला. सकाळपासूनचं धार्मिक कार्यक्रम, देहशुद्धी, प्रायश्चित्त, देवता वंदन, गणपती पुजन, पुण्याह वाचन, नांदी श्राद्ध, संभारदान व नंतर प्राकारशुद्धी, उदकशांत, कलशुद्धीकरण, नवग्रहस्थापन, अग्नीस्थापन, पूर्णाहूती आदी कार्यक्रम पार पडले. मिलिंद चोणकर, मानसी चोणकर यांच्या हस्ते कलशारोहण झाल. यानंतर महाआरती, प्रार्थना, महाप्रसाद, तर सुश्राव्य भजन, दीपोत्सव आदि कार्यक्रम होणार पार पडले. सावंतवाडी संस्थानचे राजे खेम सावंत-भोसले यांच्याप्रमुख उपस्थिती हा सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख अर्चना घारे-परब यांनी देखील मंदिरात उपस्थिती दर्शविली. या सोहळ्याप्रसंगी संस्थानचे श्रीमंत खेमसावंत भोसले, अर्चना घारे-परब, नगरसेवक शुभांगी सुकी, उत्कर्षा सासोलकर, माठेवाडा मित्रमंडळ व श्री देव आत्मेश्वर स्थानिक सल्लागार उपसमितीचे सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page