आम. दीपक केसरकर यांची उपस्थिती
*⚡वेंगुर्ले ता.१८-:* वेंगुर्ले तालुक्यातील मोचेमाड येथे उभारण्यात आलेल्या नूतन ग्रामपंचायत हमारतीचा उद्घाटन सोहळा माजी राज्यमंत्री तथा आमदार श्री. दीपक केसरकर यांच्या हस्ते शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. जनसुविधा योजना सन २०१९-२०, १४ वा वित्त आयोग सन २०१९-२० व ग्रामनिधी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.संजना संदेश सावंत, माजी जि.प. अध्यक्ष श्री. संजय पडते, पंचायत समिती सभापती सौ. अनुश्री कांबळी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या उद्घाटन कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मोचेमाड सरपंच श्रीम. स्वप्नेशा संतोष पालव, उपसरपंच श्री. श्रीकांत जगन्नाथ घाटे, ग्रामसेवक श्री. बी. ए. गर्कळ व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे.
