*⚡सावंतवाडी ता.१८-:* मळगावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव आज १८ नोव्हेंबर रोजी होत आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर ओटी भरणे, केळी-नारळ ठेवणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होणार आहेत. रात्री पालखी परिक्रमेनंतर स्थानिक दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. जत्रोत्सवानिमित्त ‘श्री’ना विविध वस्त्रालंकारांनी सजविण्यात आले आहे. तसेच मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मळगाव ग्रामस्थांनी केले आहे.
मळगाव रवळनाथ जत्रोत्सव आज
