देवस्थान समितीचे भाविकांना आवाहन
*⚡सावंतवाडी ता.१८-:* दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ख्याती असलेला श्री देवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव २० नोव्हेंबर रोजी होत आहे. गतवर्षी कोरनाच्या पार्श्वभूमीवर हा जत्रोत्सव झाला नसल्याने यंदा दोन वर्षांनी होणाऱ्या जत्रोत्सव भक्तांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र, या जत्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन देवस्थान समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
