महाविकास आघाडी सरकार ५ वर्षच काय पुढील २५ वर्ष टिकेल…

खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्वास

*⚡कुडाळ ता.१७-:* माझ्या आणि जयंत पाटील यांच्या जिल्ह्यात येण्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकेकाळी एकाच ताटात जेवलो असल्याने, जे पक्ष सोडून गेले त्यांच्यावर आपण काहीच बोलणार नसल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील मोठे नेते पक्ष सोडून गेल्याने त्यावेळी पक्षाची अवस्था बिकट झाली होती. पक्षाच्या कठीण काळात जे पक्ष सोडून गेले ते आपले कधीच नव्हते असे देखील त्या यावेळी बोलताना म्हणाल्या आहेत. इ डी च्या नोटीस शरद पवारांना देखील आल्यात, परंतु, संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता. कोणाला स्वप्नात देखील वाटले नव्हते की, महारष्ट्र मध्ये राष्ट्रवादी सत्तेत बसेल. परंतु, जनतेच्या प्रेमामुळेच आपण सत्तेत आलो. हे सरकार टिकणार नाही. असे अनेकजण बोलत होते. परंतु, या सरकारला आता २ वर्ष पूर्ण होत आली असून, संपूर्ण ५ वर्षच काय पुढील २५ वर्ष हेच सरकार असणार आहे. असा विश्वास त्यानी यावेळी व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page