*⚡वेंगुर्ले ता.१७-:* वेंगुर्ले तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या समितीची मासिक बैठक यशवंत सुभाष परब यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवार दि17 रोजी दुपारी 12.30 वाजता तहसीलदार कार्यालय येथे संपन्न झाली. सदर सभेमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ श्रावण बाळ योजनांच्या ठेवण्यात आल्या प्रकरणांमध्ये संजय गांधी अनुदान योजनेची 44 इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेची 7 व श्रावण बाळ सेवा राज्य योजनेचे 3 अशी एकूण 54 प्रकरणे मंजूर करण्यात आली. सदर सभेस समितीचे सदस्य विश्वनाथ राजाराम परब, सुकन्या रवींद्रनाथ नरसुले, तुकाराम दत्ताराम परब, चित्रा मोहन कनयाळकर, मकरंद महादेव परब, मनोहर राजाराम तहसीलदार प्रवीण लोकरे, संजय गांधी निराधार योजना विभागाचे प्रमुख लिपिक निलेश मयेकर आदी उपस्थित होते
वेंगुर्ले तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या त्रेमासिक बैठकीत 54 प्रकरणे मंजूर
