रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यावर कारवाई करा…

मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांची मागणी

सावंतवाडी शहरातील कमी रहदारीच्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले असून खासकीलवाडा हेल्थ फार्म ते शिल्पग्राम या रोडवर देखील कचऱ्याचे मोठे साम्राज्य होत असल्याने या भागात सीसीटीव्ही बसून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे तर लवकरच मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करू असे ते म्हणाले प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी असे म्हटले आहे की शहरातील खासकीलवाडा परिसरात हेल्थ फार्म शिल्पग्राम या रोडवर नागरिकांची रहदारी कमी असल्याने त्या परिसरातील दुतर्फा जंगल असल्याने मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जातो पालिकेकडून देखील हा कचरा हल्लीच साफ करण्यात आला होता मात्र त्यानंतर देखील पुन्हा कचरा टाकण्यात आल्याचे दिसत आहे यामुळे ज्या प्रमाणे मळगाव घाट परिसरात कचरा टाकण्यात येणाऱ्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत त्याच प्रमाणे खासकीलवाडा परिसरातील हेल्थ फार्म ते शिल्पग्राम परिसरात सिसिटीव्ही बसवण्यात यावेत व त्यानुसार कचरा टाकणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी तसेच त्या ठिकाणी कुणीही कचरा टाकताना आढळून आल्यास येथील नागरिकांसह आम्ही स्वतः पोलीस प्रशासन व नगरपरिषदेला कळवून कारवाई करायला लावू असा इशारा मनसे कडून देण्यात आला तर याबाबत लवकरच मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करू व त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी करू असे श्री सुभेदार म्हणाले

You cannot copy content of this page