विशाल परब यांनी खा राऊत यांच्यावरील टीका टाळावी

अन्यथा जिल्ह्यात फिरू देणार नाही सेनेच्या चंद्रकांत कासार यांचा इशारा

सावंतवाडी : विशाल परब यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर विधान करण टाळावं अन्यथा जिल्ह्यात फिरू देणार नाही. पांढरे कपडे, काळे कोट घालून नेता होता येत नाही. आधी माणगावातील वाडोस ग्रामपंचायत लढवावी, नंतर नेतेगिरी करावी. वडे खावून शिवसेना वाढविल्याचा आम्हाला अभिमान आहे. कोणाची लुबाडणूक आम्ही, आमच्या नेत्यांनी केली नाही असा जोरदार हल्लाबोल शिवसेना नेते, माजी पं.स. उपसभापती चंद्रकांत कासार यांनी केला. यावेळी अशोक दळवी, योगेश नाईक, गुणाजी गावडे, अब्जू सावंत, तात्या वेंगुर्लेकर, नाना पेडणेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page