माजी उपसभापती चंद्रकांत कासार यांचे आवाहन
सावंतवाडी : एसटी कर्मचाऱ्यांच शासनात विलीनीकरण करण्यासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. एसटी वाहतूक पुर्णतः ठप्प असून ग्रामस्थांना वाहतूकीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. गेले अनेक दिवस आंदोलन सुरू असून यावर शासन तोडगा काढेल. मात्र, तोवर एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या कायम ठेवत एसटी सेवा सुरू करावी अस आवाहन माजी उपसभापती चंद्रकांत कासार यांनी केल आहे.
