खासदार सुप्रिया सुळे यांचे कुडाळ येथे आगमन

अर्चना घारे-परब, पुंडलिक दळवी यांनी केले स्वागत

*⚡कुडाळ ता.१७-:* राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी युवती काँग्रेस मुंबई प्रदेशाध्यक्ष अदिती नलावडे सध्या सिंधुदुर्ग ज़िल्हा दौऱ्यावर असून आज त्यांचे कुडाळ येथे आगमन झाले. सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष अर्चना घारे-परब व सावंतवाडी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुळे यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

You cannot copy content of this page