भिरवंडे रामेश्वर मंदिरात 19 रोजी दिपोत्सव होणार साजरा

*⚡कणकवली ता.१७-:* कणकवली तालुक्यातील श्रीदेव रामेश्व मंदिर भिरवंडे येथे शुक्रवार 19 नोव्हेंबर रोजी दिपोत्सव साजरा होणार आहे. सायंकाळी 7 वाजता रामेश्वर मंदिर हजारे दिव्याने उजळून निघनार आहे. यासाठी भाविकांना दीपदान करण्याची संधी मिळणार आहे. दिवाळीच्या उत्सवाने समाजातील अबालवृध्द आंनदात होता आता त्रिपुरारी पौर्णिमेला भिरवंडे रामेश्वर मंदिरात प्रतिवर्षी साजरा होणारा दिपोत्सव यंदा १९ नोव्हेंबरला साजरा होणार आहे. भाविकांना तेल आणि तुपाचा दिवा श्रीदेव रामेश्वर चरणी अर्पण करण्याची संधी मिळणार आहे. आपल्या जिवणात वर्षेभर आनंद रहावा अशी प्रार्थना श्रीदेव रामेश्वर चरणी करण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवहन देवालये संचालक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे. सह्याद्रीच्या कुशीत भिरवंडे गाव वसलेला आहे. निर्सगाने नटलेल या गावाचे ग्रामदैवती श्रीदेव रामेश्वराव भाविकांची अपार श्रध्दा आहे. दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला साजरा होणाऱ्या दीपोत्सवात शेकडो भाविक सहभागी होतात. यंदा दिपोत्सवानंतर रात्री नऊ वाजता म्हापण (ता. वेंगुर्ला) येथील जल्लोष कलागुणांचा हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. रामेश्वर मंदिरात दीपदान करवयाचे असल्यास सोबतच्या खाते नंबरमध्ये रक्कम जमा करावी, देवालये संचालक मंडळ भिरवंडे -IFSCOAD-SIDC0001007, account number 007400000000136 शाखा सांगवे येथे जमा कारावी.असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page