अज्ञाताविरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल
देवगड -:तालुक्यातील विठलादेवी येथील विठलादेवी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने फोडून त्यातील सुमारे २५ हजार रोख रक्कम लंपास केल्याची घटना विठ्ठलादेव येथे घडली .या घटनेसंदर्भात प्रदीप विठ्ठल नारकर यानी विजयदुर्ग पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली.आहे.सदरची घटना ९ नोव्हे.ते १४ नोव्हे या कालावधीत घडली आहे.या घटनेतील अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम ३८०,४५४,४५७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन भालेराव करीत आहेत.
