आर्यन कदम व असद गिरकर यांची जिल्ह्याच्या सोळा वर्षाखालील क्रिकेट संघात निवड

*⚡देवगड ता.१६-:* देवगड तालुक्यातील आर्यन कदम व असद गिरकर या दोन शिरगांव क्रिकेट ॲकॅडमीच्या खेळाडूंची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या १६ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने १५ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या १६ वर्षाखालील क्रिकेट संघात आर्यन कदम व असद गिरकर या शिरगांव क्रिकेट अकॅडमीच्या दोन्ही क्रिकेटपटूंची निवड झाली आहे. या दोघांना प्रशिक्षक सुधीर साटम व उदय रूमडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. देवगड तालुक्यातील वळीवंडे येथील आर्यन कदम हा शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. जिल्ह्याच्या १६ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल या दोन्ही खेळाडूंवर क्रीडा क्षेत्रातील व सर्व स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page