काँग्रेसची तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक
*⚡सावंतवाडी ता.१६-:* आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढण्यास सज्ज ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत. त्यादृष्टीने तयारी करावी, असा निर्णय काँग्रेसच्या पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार तालुक्यामध्ये पुढील पंधरा दिवसात सभासद नोंदणीचा शुभारंभ आणि केद्र सरकारच्या महागाई विरोधात जनजागरण अभियान राबविण्याचा ठरावही यावेळी घेण्यात आला. तालुका काँग्रेसची बैठक तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी जिल्हा कॉंग्रेस उपाध्यक्ष श्री. अॅड. दिलीप नार्वेकर, जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख, जिल्हा सरचिटणीस एम एम सावंत, जिल्हा उपाध्यक्ष श्री. नागेश मोर्ये, सांस्कृतिक जिल्हाअध्यक्ष प्रविण वरुणकर, जिल्हा सरचिटणीस आनंद परुळेकर, शहर अध्यक्ष अॅड. राघवेंद्र नार्वेकर, तालुका सरचिटणीस रुपेश आईर, अन्वर खान, तालुका उपाध्यक्ष अशोक राऊळ, सच्चिदानंद बुगडे, समीर वंजारी, विभागीय अध्यक्ष अॅड. गुरु आईर, विलियम सालदाणा, सुरेश सांगेलकर, अभय मालवणकर, दत्ताराम पवार, अमिदी मेस्त्री, स्मिता वागळे, रवींद्र चव्हाण, बबन डिसौझा, व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंखेने उपस्थित होते. या बैठकीला महारष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या सुचनेनुसार सावंतवाडी तालुक्यामध्ये कॉंग्रेस सभासद नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. व पुढील १५ दिवसांमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघामध्ये मोदी सरकारच्या महागाई विरोधात जनजागरण अभियान राबविण्याचाही ठराव घेण्यात आला. व त्यानंतर विकासकामांचा व पक्ष संघटना वाढीसंदर्भात आढावा घेण्यात आला.
