खा.सुप्रिया सुळे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

मालवण दि प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे या दि. १७ नोव्हेंबर रोजी मालवण दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात त्या मालवणच्या किल्ले सिंधुदुर्ग तसेच मालवण मेढा येथील जय गणेश मंदिराला भेट देणार आहेत. खास. सुप्रियाताई सुळे या प्रथमच मालवण दौऱ्यावर येत असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे या मालवण दौऱ्यावर येत असल्याने या दौऱ्याच्या नियोजनाची पूर्वतयारीची बैठक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व्हिक्टर डान्टस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी प्रमोद कांडरकर, बाबू डायस, किरण रावले, सदप खटेखटे, सलीम खान, मिलिंद घाडगे आदी व इतर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खास. सुप्रियाताई सुळे या प्रथमच मालवण दौऱ्यावर येत असल्याने त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. मालवण भरड येथे सकाळी दहा वाजता सुप्रिया ताईंचे स्वागत झाल्यावर मालवण मेढा येथील जय गणेश मंदिराला त्या भेट देणार आहेत. त्यानंतर मालवणच्या सागरातील किल्ले सिंधुदुर्गला भेट देऊन शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेणार आहेत तर दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास मालवणच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे विद्यार्थ्यांना खास. सुप्रियाताई सुळे या मार्गदर्शन करणार असून त्यानंतर त्या ओरोस कडे रवाना होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक व्हिक्टर डान्टस यांनी दिली.

You cannot copy content of this page