रक्तदाते म्हणजे खऱ्या अर्थाने योद्धे

सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे : सातार्डा येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद

*⚡बांदा ता.१६-:* संजय पिळणकर व मित्रमंडळ तसेच या कार्यात सहभागी माजी विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदानाचे महत्त्व पटवून सांगणे व दात्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्याचे कार्य कौतुकास्पद आहे. रक्तदाते हे योद्धे आहेत,असे प्रतिपादन सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केले. सातार्डा म.गां.वि.मं. हायस्कुल सातार्डा या प्रशालेच्या ‘हिरकमहोत्सवी’ वर्षानिमित्त संजय पिळणकर व मित्रमंडळ यांच्या संकल्पनेतून आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून तसेच डी.एन.मांजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर पं.समिती सदस्य श्रुतिका बागकर, सातार्डा सरपंच संजना मेस्त्री, कवठणी सरपंच सुमन कवठणकर, किनळे सरपंच दीपक नाईक, संस्थेचे अध्यक्ष महेंद्र मांजरेकर, शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत सावंत, संस्थेचे कार्यवाह जॉकी फर्नांडिस, संस्थेचे सदस्य अनिल तळवणेकर, प्रशांत पुनाळेकर, डी.एन.मांजरेकर सर आदी उपस्थित होते. सातार्डा मध्यवर्ती संघ मुंबई या संस्थेचे कार्यवाह जॉकी फर्नांडिस यांनी संस्थेच्या अमृतमहोत्सवी व शाळेच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून संजय पिळणकर व मित्रमंडळ, तसेच त्यांना सहकार्य करणारे माजी विद्यार्थी व माजी मुख्याध्यापक डी.एन.मांजरेकर यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी रक्तदानाविषयी विस्तृत माहिती दिली. यावेळी तब्बल ७६ वेळा रक्तदान करणारे सावंतवाडी शहरातील सुधीर पराडकर तसेच सावंतवाडी शहरात सुमारे ३६ वर्षांपूर्वी रक्तदानाची चळवळ सुरू करणारे आनंद वेंगुर्लेकर, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सचिव बाबली गवंडे, तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला सावंतवाडी रक्तपेढी व एसएसपीएम पडवे, तालुका वैद्यकीय अधिकारी उत्तम पाटील, मळेवाड वैद्यकीय अधिकारी अदिती ठाकूर, आरोग्य सेविका परब, जंगम यांचे सहकार्य लाभले. तसेच सुधा उर्फ सुदन कवठणकर, रुपेश साळगावकर, राजन हळदणकर, उमेश मांजरेकर, पपी कवठणकर, सुदन केरकर, उमेश कांबळी, यामेश्वर कवठणकर, मडूरा उपसरपंच विजय वालावलकर, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी ८० रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पिळणकर यांनी केले. सूत्रसंचालन पपी कवठणकर व संतोष कांबळी यांनी तर आभार संतोष कांबळी व डी. एन.मांजरेकर यांनी मानले.

You cannot copy content of this page