मालवणहुन कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या इनोव्हा गाडीचा कुपेरी घाटीत अपघात…

सुदैवाने कोणालाही दुखापत नाही…

मालवण दि प्रतिनिधी मालवणहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या इनोव्हा गाडीला आज रात्री सात वाजण्याच्या सुमारास कुणकावळे येथील कुपेरीच्या घाटीत अपघात झाल्याची घटना घडली आहे सुदैवाने या अपघातात कोणाला दुखापत झाली नसल्याचे समजते मालवणच्या पर्यटनाचा आनंद लुटून आज रात्री घरी परतणाऱ्या कोल्हापूर येथील पर्यटकांची इनोव्हा गाडी ही कुपेरीच्या घाटीत उतारावर आली असताना पाऊस पडत असल्याने समोरच्या रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याची चर्चा सुरू होती या अपघातात इनोव्हा गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले याबाबत पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती

You cannot copy content of this page