रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर च्या माध्यमातून जागतिक मधुमेह दिन साजरा…

मालवण पोलिस अधिकारी व तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची करण्यात आली तपासणी

मालवण फी प्रतिनिधी जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मालवण यांच्या वतीने सोमवारी मालवण पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालय येथील अधिकारी, कर्मचारी अशा सुमारे ५० जणांची मधुमेह, हृदयरोग व रक्तदाब तपासणी मालवण पोलीस ठाणे येथे करण्यात आली. डॉ विवेक रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ कर्मचाऱ्यांच्या वतीने ही तपासणी करण्यात आली. कोविड कालावधीत पोलीस, महसूल प्रशासनने सातत्याने कार्यरत राहून तणावपूर्ण वातावरणात सेवा बजावली. काही कर्मचारी कोरोना बाधित झाले. कोरोनावर मात करून पुन्हा हे सेवेत रुजू झाले. एकूणच जनतेसाठी झोकून देऊन काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक भावनेतून मोफत स्वरूपातील हे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केल्याचे रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरचे विश्वस्त रविकिरण तोरसकर यांनी सांगितले. यावेळी संस्थेच्या वैद्यकीय तपासणी चमू बरोबरच रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरचे विश्वस्त रविकिरण तोरसकर, पोलीस निरीक्षक श्री. ओटवणेकर, श्री.बाबा गिरकर ,नायब तहसीदार श्री. गंगाराम कोकरे व इतर मान्यवर उपस्थित होते. अश्या च प्रकारचे नेत्र व अस्थी तपासणी शिबिराचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे असे संस्थेचे अध्यक्ष डॉ.विवेक रेडकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page