*⚡मालवण ता.१५-:* दारू बंदीचा पुरस्कर्ता म्हणून ख्याती पसरलेल्या व जागृत देवस्थान म्हणून मान्यता पावलेल्या मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरात गेले सात दिवस सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप उद्या मंगळवारी दि. १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरात गेले सात दिवस सुरू असलेल्या या हरिनाम सप्ताहाला मालवण तालुक्यातील अनेक नामवंत भजनी मंडळां बरोबरच भजनी मंडळांनी सहभाग दर्शविल्याने मसुरे डांगमोडे गाव भक्तिरसात बुडून गेला. कार्तिक शुद्ध पांडव पंचमीला सुरू झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाला नामवंत भजनी कलाकारांनी तसेच भजनी मंडळांनी हरिनाम गाऊन ईशसेवा केली. या हरिनाम सप्ताहात पारंपारिक भजना बरोबरच वारकरी भजन, गोपनृत्य, लहान मुलांच्या भजनांनी रंगत आणली उद्या मंगळवारी दुपारी या सप्ताहाची प्रथेनुसार समाप्ती होणार आहे कोरोना प्रतिबंधक नियम पाळून पार पडलेल्या या हरिनाम सप्ताहाला भाविकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल देवस्थान विश्वस्त मंडळाने आभार मानले आहेत
डांगमोडे येथील रवळनाथ मंदीरातील हरिनाम सप्ताहाची उद्या सांगता*
