जिल्ह्यात खड्ड्यांचे साम्राज्य; संध्या तेरसे यांचा आरोप
कुडाळ:आताच्या पालकमंत्री यांच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बट्ट्याबोळ झाला आहे.सध्या विकासाची काम ही फक्त पालकमंत्री आपल्या घरापूरतीच मर्यादित करत आहेत. जिल्ह्यात खड्डेच खड्डे दिसत आहे.हा जिल्हा खड्ड्यात घालण्याचे काम पालकमंत्री यांनी केले.उदयाच्या जिल्हा नियोजन सभेत काय ते दाखवून देवू. कुडाळ नगरपंचायती च्या विकास कामात नेहमीच अडथळे निर्माण करण्याचे काम सत्ताधारी यांनी केले.जर विकास कामांना योग्य न्याय दिला नाही तर ही सभा वादळी होणारच असा इशारा संध्या तेरसे यांनी दिला आहे.
