सेनेच्या पदाधिकाऱ्यांची लाभली उपस्थिती
मालवण दि प्रतिनिधी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांचा वाढदिवस आज शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली तसेच फातिमा आश्रमात धान्य वाटप करण्यात आले. शिवसेना शाखा कार्यालयात श्री. खोबरेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली तर फातिमा आश्रमात धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेवक पंकज सादये, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख जोगी, उमेश मांजरेकर, यशवंत गावकर, प्रसाद आडवणकर, तपस्वी मयेकर , श्याम झाड यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. फोटो ओळी- शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
