विजांच्या गडगडाटासह कणकवलीत पाऊस बरसला

तुळशी विवाहाच्या निमित्ताने दाखल व्यापार्‍याची उडाली धांदल

*⚡कणकवली ता.१५-:* पाऊस गेला असे वाटत असतानाच आज विजांच्या कडकडाटासह कणकवलीमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सर्वांचीच धांदल उडाली.तब्बल दोन तास पाऊस कोसळत असल्याने सारेच व्यवहार ठप्प झाले होते. सकाळपासून वातावरण गरम होते त्यामुळे सायंकाळी पाऊस पडेल असा अंदाज होता हा अंदाज खरा ठरविताना पावसाने आपले उग्र रूप दाखविले.तापलेले वातावरण दुपारनंतर थंड झाले आहे. कणकवली शहरामध्ये सायंकाळी चार नंतर विविध भागात ठिकठिकाणी जोरधार पाऊस कोसळला. सिंधुदुर्गात तुळशी विवाहाला सुरवात होणार आहे त्यानिमित्ताने कणकवली बाजारात विवाहासाठी लागणारे चुरमुरे व अन्य साहित्य विक्रीसाठी दाखल झाले होते मात्र दुपारच्या सुमारास आकाश ढगांनी भरून आल्याने आणि मुसळधार पावसाळा सुरुवात झाल्याने विक्रेते संकटात सापडले असून तुळशी विवाहाच्या उत्साहावर काही प्रमाणात विरजण पडले. कणकवली शहरात बाहेर गावातून आलेल्या विक्रेत्यांची धांदल उडाली आहे. कणकवली तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अजूनही भात कापणी बाकी असल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

You cannot copy content of this page