*⚡मालवण ता.१५-:* मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचलित ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विधार्थ्यांसाठी दोन गटामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ८ डिसेंबर रोजी बुद्धिबळ स्पर्धा सकाळी १० वाजता होणार आहे. १४ डिसेंबर रोजी भावगीत व भक्तीगीत गायन स्पर्धा सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत होणार आहे. त्याच दिवशी दुपारी १.३० ते ५ वाजे पर्यंत सवेश साभीनय नाट्यगीत गायन स्पर्धा होणार आहे. १८ डिसेंबर रोजी मराठी शुद्धलेखन व हस्ताक्षर स्पर्धा सकाळी १०.३० वाजता होणार आहे. गट क्र. १ ( ५ वी ते ७ वी ) प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे १०००, ५००,३०० रुपये पारीतोषीक व प्रशस्तिपत्रक तर गट क्र. २ ( ८ वी ते १० वी) प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे १०००, ५००, ३०० रुपये पारीतोषीक व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. स्पर्धक नाव नोंदणीसाठी ७४४७५३६५७९, ९४२०८२२५५३ येथे संपर्क साधण्याचे आवाहन स्पर्धा प्रमुख प्रविण पारकर, शाळा समिती अध्यक्ष किशोर नरे, मुख्याध्यापक पी. आर. खोत यानी केले आहे.
ओझर विद्यामंदिरच्या हिरक महोत्सवानिमित्त विविध स्पर्धा
