भाजप युवा नेते विशाल परब यांचा खा राऊत यांच्यावर टीका;विकासाच्या मुद्द्यावर बोलत नसल्याचेही केली टीका
*⚡कुडाळ ता.१५-:* रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक खासदार होऊन गेलेत परंतु, खासदार विनायक राऊत हे कधीच विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. बडी बडी बाते आणि वडापाव खाते अशी त्याची अवस्था असल्याची टीका भाजप युवा नेते विशाल परब यांनी लेमन ग्रास येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. जिल्ह्यात शिवसेनेत गटबाजी असून, स्वतःच अपयश लपविण्यासाठी ते केवळ राणेंवर टीका करण्याचं काम करतात. राणेंवर बोलून केवळ मत मिळवणे हेच विनायक राऊत यांचे काम असल्याचा आरोप विशाल परब यांनी केला आहे. राऊत यांनी राणेंवर यापुढे टीका केली तर त्यांना महागात पडेल असा इशारा देखील खा. राऊत यांना दिला आहे.
